करमाळा तालुक्यात 13 दिवसांत 11 जण बेपत्ता; सहा पुरुष व पाच महिलांचा समावेश

करमाळा, ता.13: तालुक्यात केवळ 1 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर या अवघ्या तेरा दिवसांच्या कालावधीत तब्बल 11 जण बेपत्ता झाल्याची चिंताजनक नोंद समोर आली आहे. यात सहा पुरुष व पाच महिलांचा समावेश असून बेपत्ता व्यक्तींमध्ये 78 वर्षीय वृद्ध महिला व 16 वर्षीय अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

करमाळा पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार बेपत्ता झालेल्यांची माहिती पुढीलप्रमाणे:
- 3 ऑक्टोबर – वंजारवाडी येथील 78 वर्षीय महिला
- 4 ऑक्टोबर – करमाळा येथील वैभव कांबळे, 7 ऑक्टोबर – फिसरे येथील सोमनाथ ढेपे, 8 ऑक्टोबर –मारकड वस्ती ( उमरड) येथील
- 16 वर्षाचा अज्ञान मुलगा
- 8 ऑक्टोबर –उमरड मारकड वस्ती येथील 19 वर्षीय युवती,
- 8 ऑक्टोबर – देवीचे माळ येथील 23 वर्षीय तरुणी,9 ऑक्टोबर – पाथर्डी येथील नागनाथ वाघे (वय 53), चिखलठाण येथील 17 वर्षे 9 महिने वयाची मुलगी 10 ऑक्टोबर – जेऊर येथील 21 वर्षीय युवती
- 11 ऑक्टोबर – केतुर नं.1 येथील देविदास कोकणे,13 ऑक्टोबर – भाळवणी येथील आप्पा झेंडे यांचा समावेश आहे.

बेपत्ता व्यक्तींबाबतच्या काही तक्रारींमध्ये अपहरणाचा संशय व्यक्त करण्यात आला आहे, तर काही नोंदी या ‘हरवल्याच्या,’ स्वरूपातील आहेत. सर्व प्रकरणांमध्ये करमाळा पोलिसांनी तक्रारी नोंद करून तपास सुरू केला आहे. या बेपत्ता व्यक्तींपैकी कोणीही आढळल्यास तत्काळ करमाळा पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




 
                       
                      