करमाळा तालुक्यात दोन तरुणी बेपत्ता

करमाळा(ता.8): तालुक्यात 5 आणि 8 सप्टेंबर ला दोन तरुणी बेपत्ता झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी करमाळा पोलिसांत हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.:

गोरेगाव येथील 19 वर्षांची युवती, 8 सप्टेंबरला बेपत्ता झाल्याबाबत कुटुंबीयांनी तक्रार केली असून, तिचा अद्याप काहीही ठावठिकाणा लागत नाही. त्याचप्रमाणे वांगी नंबर दोन येथील 25 वर्षांची विवाहिता ही सुध्दा बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे. दोन्ही तक्रारी कुटुंबातील प्रमुखांनी दिल्या असून, करमाळा पोलिसांनी त्यास गांभीर्याने घेतले आहे.

सध्या या प्रकरणाचा तपास पोलिस कर्मचाऱ्यांकडून जोरदार सुरु असून शोधकार्य सुरू आहे.



