बारामतीत रामराव दराडे यांना राज्यस्तरीय पुरस्कार-कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सत्कार

करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.27: श्रीयश एज्युकेशन फाउंडेशन, बारामती यांच्या वतीने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला. यामध्ये रामराव दराडे शेलगाव (वांगी)यांना पुरस्कार देण्यात आला आहे.:


हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला.

या पुरस्कार सोहळ्यात भारतीय कृषी अनुसंधान संस्थेचे माजी कृषी अधिकारी व योगप्रशिक्षक रामराव दराडे यांना शैक्षणिक (कृषी) क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना ट्रॉफी व प्रशस्तिपत्रक प्रदान करून सत्कार करण्यात आला.

तसेच शेलगाव (वांगी), ता. करमाळा येथील श्री. अनिल केकान यांना उत्कृष्ट केळी उत्पादक म्हणून विशेष सन्मान देण्यात आला.या गौरवामुळे श्री.दराडे यांचा ग्रामसुधार समिती तर्फे विशेष सन्मान करण्यात आला आहे.



