उत्तम आरोग्य व आनंदी जीवनासाठी सकारात्मक विचारांची गरज – डॉ. सुभाष सुराणा -

उत्तम आरोग्य व आनंदी जीवनासाठी सकारात्मक विचारांची गरज – डॉ. सुभाष सुराणा

0

करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.१२: उत्तम आरोग्य मिळवण्यासाठी केवळ आहार आणि व्यायाम पुरेसा नसून सकारात्मक विचारांचीही तितकीच मोठी गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ  व आनंद ग्रामीण बिगर शेती पत संस्थेचे संस्थापक चेअरमन डॉ. सुभाष सुराणा यांनी केले.
जेऊर येथील आनंद ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात  आयोजित ‘जिव्हाळा मेळाव्यात” निमंत्रक म्हणून  ते बोलत होते.

डॉ. सुराणा पुढे म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीला आयुष्य आनंदी व समाधानी जगायचे असेल तर स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी स्वतः घ्यावी लागते. विषमुक्त अन्न, सकस आहार घेणे, नियमित व्यायाम करणे आणि मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी मित्रपरिवाराशी संवाद राखणे आवश्यक आहे. जीवनातील एक महत्त्वाची बाब म्हणजे कधीही मुलांकडून पैसे मागण्याची वेळ येऊ नये, यासाठी आर्थिक नियोजन लवकर करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.शिक्षणाबाबत बोलताना विद्यार्थ्यांना गरज नसताना कोचिंग क्लासेससाठी वेळ व पैसा खर्च करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या मेळाव्यात शिक्षक विकास पाथरूडकर, प्रा. डॉ. संजय चौधरी, ज्येष्ठ कवी प्रकाश लावंड, प्राचार्य नागेश माने, उद्योजक श्रेणिक शेठ, खाटेर,एच.बी. डांगे   अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल माने, सेवानिवृत्त शिक्षक एन. डी. सुरवसे,  स्वराली जाधव,विमा व्यवसायिक धनंजय वळेकर, यांनी मनोगत व्यक्त केले. सेवानिवृत्त मुख्याध्यापक लक्ष्मण लष्कर व मांजरगाव चे शाहीर
बनराव खरात , मोरेश्वर अण्णा पवार यांनी गीत सादर केले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी अ‍ॅड. डॉ. बाबुराव हिरडे यांनी समाजातील सध्याची परिस्थिती अत्यंत विचित्र असल्याचे नमूद करत, चांगले विचार असणाऱ्या व्यक्तींनी एकत्र येऊन सामाजिक प्रश्न सोडवण्याची गरज असल्याचे सांगितले. ‘जिव्हाळा ग्रुप’च्या माध्यमातून विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा संकल्प केला असून त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. पुढील दोन सत्रे उद्योग निर्मितीवर उद्योजक दत्तात्रय पवार व सुहास डांगे यांच्याकडे होणार असल्याचे सांगितले.

यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे बाळासाहेब रोंगे, संतोष बारकुंड,  श्रेणिकशेठ खाटेर,  राजकुमार राठोड, नानासाहेब साळुंके, गंगाधर पोळ, कोठारी, पवार अण्णा,रेश्मा जाधव आदी मान्यवरांचे  विशेष  सत्कार करण्यात आले. हे सत्कार यश कल्याणीचे अध्यक्ष गणेश करे पाटील अभियंता डिकेपासनराव अंधश्रद्धा निर्मूलनचे संजय हांडे माजी मुख्याध्यापक रामचंद्र बोधे यांनी एन.डी.सुरवसे, नाथजीराव शिंदे अरुण बापू धुमाळ, प्रतापराव बागल ,ॲड. सुविता शिंदे ॲड.अपर्णा पदमाळे ,ॲड. माया जाधव  विलास आप्पा लबडे, विठ्ठलराव भणगे,  डी.के. पासंगराव, आदींच्या हस्ते करण्यात आले. पुढील दोन सत्रे उद्योजकता या विषयावर होणार असून,
या कार्यक्रमास कार्यकारी संचालक हरिदास डांगे, उद्योजक तात्यासाहेब कळसाईत, संचालक भारत साळुंखे, शिक्षक पंडित रोकडे, आदर्श शेतकरी विजय लबडे, माजी नगरसेविका संगीता खाटेर, माजी शिक्षिका उज्वला मेहता, अ‍ॅड. सविता शिंदे, ॲड. अपर्णा पद् माळे ,मुथा अबॅकस च्या ज्योती मुथा, ॲड.अंकिता वेदपाठक,ॲड.माया जाधव, प्रा. लावंड, साळुंखे आप्पासाहेब लांडगे, निळकंठ ताकमोगे ,प्रा. सुहास गलांडे, माजी प्रशासनाधिकारी राजेंद्र रणसिंग आदिनाथ चे उपाध्यक्ष महेंद्र पाटील, पत्रकार, शिक्षक, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार गजेंद्र पोळ यांनी केले. प्रास्ताविक डॉ. सुभाष सुराणा यांनी तर आभार  भूषण लुंकड यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!