किरकोळ कारणावरून चाकू हल्ला- वाशिंबे येथील घटना

करमाळा : किरकोळ कारणावरून वाशिंबे (ता. करमाळा) येथे चाकूने वार करून एकास जखमी केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार 19 सप्टेंबर ला सायंकाळी 4-30 वाजता घडला आहे.

याप्रकरणी रमेश बापू सपकाळ यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, दि. 19 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता मी वाशिंबे बसस्टँडवर बसलेले असताना, हनुमंत पवार हा आला. “तू नेहमी मला आडवा चालतोस, तुझ्यामुळे मला जेलमध्ये बसण्याची वेळ आली,” असे म्हणत त्याने शिवीगाळ केली. त्यानंतर हातातील चाकूने माझ्या कानाजवळ व इतर ठिकाणी हल्ला करून जखमी केले.
या घटनेनंतर करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.




