जगताप विद्यालयातील १९९६ च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात संपन्न -

जगताप विद्यालयातील १९९६ च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात संपन्न

0

करमाळा (संदेश प्रतिनिधी ) – जुने मित्र मैत्रीण त्यांच्यासोबत शिकत असताना घडलेले गमतीशीर किस्से शिक्षण घेत असताना काढलेल्या खोड्या अशा साऱ्या आठवणींना उजाळा देत आठवणीत रमले करमाळा येथील कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या माजी विद्यार्थी मेळाव्याचे या सोहळ्यासाठी दहावीतील 1996 बॅचचे तब्बल एकूण 40 विद्यार्थी उपस्थित होते. सोलापूर पुणे नाशिक संभाजीनगर अशा अनेक जिल्ह्यातून आपल्या जुन्या मित्रांना भेटण्यासाठी सर्वजण एकत्र आले होते

करमाळा शहरातील बायपास जवळील राजयोग हॉटेलमध्ये सदरचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यामध्ये जुन्या मित्र-मैत्रिणींनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत सर्वांना हसवले उपस्थित सर्वांनीच आपले मनोगत व्यक्त केल. यावेळी संगीत खुर्ची खेळताना व डान्स करताना सर्व जण रमून गेले.


विद्यालयातील माजी शिक्षक बोबेसर रमेश कवडे सर पांडुरंग वीर सर अर्जुन फंड सर विजय घोडके सर काठोळे सर इक्बाल खान सर जाधवर सर आदी शिक्षकांचा यावेळी माजी विद्यार्थ्यांनी स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला यावेळी ललित शहाणे सुधीर झिंजाडे मीनाक्षी कटके विकास वीर व विवेक ओहोळ यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

सदर कार्यक्रमास सुजाता शेंडगे, ममता कांबळे, आरती मेहता, गौरी अवघडे, अनिता कोकडे, ममता कुलकर्णी, पल्लवी शिंगाडे, पप्पू काळे, रेश्मा पठाण, ज्योती बरीदे, भालचंद्र भोसले, पंडित जाधव, योगेश माने,विशाल झिंजाडे, संदीप जाधव पाटील, इरफान शेख, अमोल शहाणे,संतोष कांबळे देवराव बागल, मिलिंद कांबळे, गणेश जाधव,सचिन वेलीवेट्ट, आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा मांगले यांनी केले या कार्यक्रमाचे संयोजन मकरंद वनारसे विवेक ओहोळ राहुल लिमकर नितीन घोडेगावकर आदींनी केले तर आभार विवेक ओहोळ यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!