देशमुख खून प्रकरणातील आरोपींना फाशीच्या मागणीसाठी केम येथे कडकडीत बंद

केम(संजय जाधव): मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे झालेल्या हत्येच्या निषेधार्थ धनंजय मुंडे यांना मुख्य सूत्रधार करून गुन्हा दाखल करावा व आरोपींना फाशी व्हावी या मागणीसाठी करमाळा तालुका बंदची हाक सकल मराठा समाजाने दिली होती. याला केम येथे शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.
केम येथे व्यापारी पेठ, हाॅटेल, किराणा दुकाने, मंडई पूर्णपणे बंद होती. तसेच केम येथील सर्व शैक्षणिक संस्था बंद होत्या केम येथे संपूर्ण गावात शुकशूकाट होता. मस्साजोग घटनेचा मास्टर माईंड वाल्मिक कराड व आमदार धनंजय मुंडे याना मुख्य सूत्रधार आरोपी करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपीना भर चौकात फाशीची शिक्षा मिळावी असी मागणी केम सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली.
या बंदला शिवसेना महिला आघाडी उबाठा गटाच्या वतीने जाहिर पाठिंबा दिला अशी माहिती तालुका प्रमुख सौ वर्षा ताई चव्हाण यांनी दिली.





