कोंढेज येथे अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न -

कोंढेज येथे अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न

0

कंदर(संदीप कांबळे) : करमाळा तालुक्यातील कोंढेज येथील विठ्ठल मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. ह.भ.प. संजयानंद झानपुरे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.



सप्ताहादरम्यान दररोज पहाटे काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, महिला भजन, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन तसेच हरीजागर असे दैनंदिन कार्यक्रम पार पडले. या सप्ताहात दिगंबर महाराज पवार (देवगाव), महादेव महाराज साखरे (राजुरी), बाळासाहेब महाराज शिंदे (अनाळा), बिभीषण महाराज (निक्त, खादगाव), बब्रुवाहन महाराज गोडगे (रोपळे), शरद महाराज आदलिंग (कोंढेज) आणि बाळकृष्ण झानपुरे महाराज (साडे) यांची प्रवचने झाली.



तसेच ह.भ.प. संजयानंद झानपुरे महाराज, हरिदादा झानपुरे महाराज, मंदार सरवदे महाराज, सागर दादा झानपुरे महाराज, बाळकृष्ण झानपुरे महाराज आणि गोरख सुपे महाराज यांच्या कीर्तनांनी सप्ताहात रंगत आणली. श्रीराम जन्मोत्सवानिमित्त ह.भ.प. नवनाथ महाराज ननवरे यांचे विशेष कीर्तन झाले.

दि. 27 मार्च रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत ह.भ.प. धनुदादा महाराज सरवदे यांचे काल्याचे कीर्तन पार पडले, अशी माहिती राजेंद्र चांगण व निवास महामुनी यांनी दिली.

या कार्यक्रमास भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सप्ताह यशस्वी करण्यासाठी विठ्ठल भजनी मंडळ व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!