चिखलठाण येथील सुराणा विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : चिखलठाण (ता.करमाळा) येथील रामबाई बाबुलाल सुराणा विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. रयत शिक्षण संस्थेच्या,श्रीमती रामबाई बाबुलाल सुराणा विद्यालयात अनिवासी गुरुकुल प्रकल्पामध्ये विविध सहशालेय उपक्रम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभात अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये भाषा विषयांच्या वक्तृत्व व निबंध स्पर्धा घेऊन त्यातील प्रथम तीन क्रमांकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली. सदर कार्यक्रमास स्कूल कमीटी सदस्य संदिपान बारकुंड तसेच प्रमुख पाहुणे म्हणून यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे – पाटील उपस्थित होते.
बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमानंतर वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य करून उपस्थितांची मने जिंकली या कार्यक्रमामध्ये देशभक्तीपर गीते,लोकगीते,कॉमेडी सॉंग यांचा समावेश होता.सदर कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाचे कौतुक केले व भरभरून बक्षीस दिली. तसेच यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने विद्यालयात दोन स्मार्ट टीव्ही संच देण्याची घोषणा केली.
या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्रकुमार बारकुंड स्थानिक स्कूल कमिटी सदस्य केरू गव्हाणे माजी सरपंच चंद्रकांत सरडे माजी उपसभापती दत्तात्रय सरडे,जयवंत नलवडे, दिनकर सरडे,मच्छिंद्र सरडे,रावसाहेब नेमाने, चंद्रकांत सुरवसे, साहेबराव मारकड,भाऊसाहेब सरडे, भिमराव गव्हाणे,राजाभाऊ कवितके,इनुस सय्यद,महादेव पोरे,शहाबुद्दीन सय्यद,महेश कानगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक गुरुराज माने, गुरुकुल विभाग प्रमुख साईनाथ लोहार, धनंजय भोसले शिवाजी मासाळ नवनाथ शेंडगे लक्ष्मण गोडगे श्रीकांत बिराजदार रेवन्नाथ जाधव, सोनाली बुधकर,यशवंत मुंडे,श्रीराम केदार,योगेश धस,बिभीषण भोई,लक्ष्मण भोसले,नूतन धुमाळ प्रशांत गायकवाड,शंकरराव देशमुख,महादेव बिराजदार यांनी परिश्रम घेतले.