उद्योगपती भरत आवताडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : उद्योगपती भरत आवताडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. भैरवनाथ शुगर (विहाळ ) चे कार्यकारी संचालक किरण तात्या सावंत यांनी आवताडे यांचे संपर्क कार्यालयात त्यांचा सत्कार केला.

याप्रसंगी सुधाकर लावंड, नाना मोरे, अमोल परदेशी, अरूण टांगडे, डी. जी. पाखरे आदि मान्यवर उपस्थित होते. तसेच वीर चौक, वेताळपेठ येथील श्रीराम मंदिर जीर्णोध्दार समितीचे वतीनेही आवताडे यांचा श्रीराम मंदिरात सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिराच्या नव्याने लावण्यात आलेल्या चौकटीचे पूजन त्यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी श्रीराम मंदिराचे उर्वरित कामासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन आवताडे यांनी दिले. याप्रसंगी विजय देशपांडे, दर्शन कुलकर्णी, महेश परदेशी, विवेक इनामदार, बबन विंचू महाराज आदीजण उपस्थित होते. याबरोबरच करमाळा शहरात व गावोगावी श्री. आवताडे यांचे सत्कार कार्यक्रम संपन्न झाले. संपर्क कार्यालयात दिवसभर युवा कार्यकर्त्यांनी सत्कारासाठी मोठी गर्दी केली होती. या सर्वांचे आभार भरत आवताडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!