उत्तरेश्वर मंदिरात शिवलिंगाला चंदन उटी लावण्याचा सोहळा संपन्न
केम (संजय जाधव) – केम येथील जागृत ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर देवस्थान शिवलिंगाला सालाबादप्रमाणे या हि वर्षी ८ जून रोजी सायंकाळी ६.वा ५३मी. मृग नक्षत्राचे आगमन झाले रात्री मंदिरात ९ ते ११:३० पर्यंत भजन करण्यात त्यानंतर बरोबर १२:०५ मि. उन्हाळ्याच्या उष्णता ची दाहकता महादेवाच्या शरीरास झालेली शितल करण्यासाठी पूजाअर्चा करून महादेवाच्या शिवलिंगास चंदन उटी लावण्यात आली. या वेळी शिवलिंगावर थंड पाण्याची संततधार शिवलिंगाला सुरू केली.
या सोहळ्यासाठी श्री ऊत्तरेश्वर देवस्थान मंहत जयंतगिरी महाराज, श्री ऊत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मनोज सोलापुरे, विजय बाप्पा तळेकर, मोहन दौड, राहुल कोरे,दादा नवले, बापू देवकर, अमोल गलांडे, ऊत्तरेश्वर दगड फोडे पळसकर,तुषार शिंदे, ऊत्तरेश्वर टोणपे, केदार, श्री राम गलांडे,दाउद शेख, संदिप गोडसे आदि उपस्थित होते.