करमाळा मेडिकोज गिल्डचा ‘रंगतरंग’ कार्यक्रम उत्साहात संपन्न
करमाळा (संदेश प्रतिनिधी): करमाळा मेडीकोज गिल्ड या डॉक्टरांच्या संघटनेचे वार्षिक स्नेहसंमेलन “केएमजी रंग तरंग २०२३” करमाळ्यात नुकताच पार पडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.रामदास झोळ हे होते. कार्यक़माचे प्रमुख पाहुणे म्हणून स्त्री रोग तज्ञ डॉ.वसंतराव पुंडे उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर डॉ.संदेश शहा, ,प्रा.अश्विनी ओहोळ व केएमजी पदाधिकारी उपस्थित होते. हा कार्यक्रम दत्तकला शिक्षण संस्था पुरस्कॗत होता. प्रा.झोळ सरांनी शैक्षणिक संस्था, शैक्षणिक विकास, शैक्षणिक योजना व शिक्षणाबाबतची अनास्था यावर व्याख्यान दिले.डाॅ.वसंतराव पुंडे यांना केएमजी तर्फे यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.सौ.अश्विनी भोसले यांचे कॅन्सर वरील संशोधनात भारत सरकारकडून मिळालेल्या पेटंटमुळे संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला.सर्व मान्यवरांचे केएमजी तर्फे सत्कार व आभार मानण्यात आले.
सूत्रसंचालन श्री व सौ भुजबळ यांनी केले. यानंतर गॅदरिंगची सुरूवात दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमात लेडीज डॉक्टरांचा “बाईपण भारी देवा ” व जेंडस डॉक्टरांचा लेझी डान्स ने उपस्थितांचे लक्ष वेधले व रंगत आणली.बाईपण भारी देवा मध्ये डॉ.शेलार, डॉ पाठक, डॉ तळेकर, डॉ कदम, सौ गाढवे या लेडीज डॉक्टरांनी सहभाग घेतला.तर लेझी डान्स मध्ये डॉ दोभाडा, डॉ माळवदकर, डॉ शेटे, डॉ कटके, डॉ कापले यांनी सहभाग घेतला.डाॅटर माॅम डान्स मध्ये डॉ यमगर मॅडम, सौ कटके यांनी तर डयुएट डान्स मध्ये डॉ भोसले व डॉ अगरवाल यांनी सहभाग घेतला.डाॅ सौ भुजबळ यांनी प्रेमकविता तर डॉ बागवान, डॉ तळेकर, डॉ साळुंखे यांनी हास्य कविता केली.
कार्यक्रमाला अधिक रंगत आणली केएमजी डॉक्टरांच्या उत्कृष्ट गायनाने. डाॅ पवार पाटील, डॉ माळवदकर, डॉ व्हरे, डॉ शेटे, डॉ खडके, डॉ बुधवंत, डॉ गादिया, डॉ देवकर, डॉ गाढवे, डॉ सौ यमगर व डॉ श्री व सौ घाडगे यांनी प्रभावशाली गायन केले. डॉ कुलकर्णीचा स्टेज डान्स व हालगीतुरा अफलातून होती.
स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन डॉ तळेकर व डॉ साळुंखे यांनी केले. या कार्यक्रमासाठी करमाळा तालुक्यातील सर्व डॉक्टर्स तसेच माढा बार्शी टेंभुर्णी इंदापूर व भिगवन कर्जत येथून ही के एम जी डॉक्टर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.डाॅ दोभाडा यांनी उपस्थितांचे आभार मानले.