धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केमसह तालुक्यातील विविध गावांचा केला भेट दौरा
केम (संजय जाधव) माढा लोकसभेसाठी इच्छुक असलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी करमाळा तालुक्यात भेटीचा सपाटा लावला आहे. त्यांनी शनिवार दि ६ रोजी देवळाली, करमाळा, गुळसडी, झरे, वीट, वरकटणे, निंभोरे, मलवडी, करून त्यांनी केम येथे प्रथम श्रीराम तरकसे यांच्या घरी भेट दिली. नुकतेच श्रीराम तरकसे यांच्या मातोश्रींचे निधन झाले. त्यांच्या कुटूंबाची भेट घेऊन सांत्वन केले.
या वेळी माजी सरपंच अजित दादा तळेकर,चेअरमन बापुराव तळेकर,शिवसेनेचे उपतालुका प्रमुख श्री हरि भैया तळेकर, युवा सेनेचे सागर राजे तळेकर, अविनाश तळेकर, आदि उपस्थित होते. त्या नंतर ते केम येथील आमदार संजयमामा शिंदे यांचे समर्थक मारुती पारखे यांंच्या निवास्थानी जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.
या वेळी ग्रामपंचायत सदस्य गोरख पारखे, योगेश ओहोळ, माजी पंचायत समिती सदस्य विष्णू पारखे, हरि पारखे चेअरमन अरूण लोंढे मोहिते पाटिल गटाचे कटृर समर्थक अमर सांळुखे,बाळासाहेब बिचितकर, मुखयाध्यापक देवकर सर गबु पठाण, शिवसेना अध्यक्ष सतीश खानट,जोतिराव पारखे, राहुल बिचितकर, या शिवाय ग्रामस्थ ऊपस्थित होते. माढा लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर मोहिते पाटिल यांनी अचानक मारूती पारखे यांच्या निवास्थानी जाऊन भेट घेतल्याने येथील नागरिकांतून राजकारणावर चर्चा रंगू लागली आहे.