घरात फरशी बसवणाऱ्या कारागीराने केली चोरी – १ लाख ८० हजाराचा ऐवज लंपास

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी : नवीन घरात फरशी बसविण्याचे काम करणाऱ्या कारागीरानेच घरात कोणी नाही हे पाहून १ लाख ८० हजार रूपये ऐवजाची चोरी केली आहे. हा प्रकार २३ जानेवारीला सकाळी साडेदहा ते पाच च्या दरम्यान पिंपळवाडी (ता. करमाळा) येथे घडला आहे. या प्रकरणी अंगद आप्पासाहेब काळे यांनी फिर्याद दिली आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे, की पिंळवाडी येथील गट नं. ३५ /२ मध्ये घराचे बांधकाम चालू आहे. घरात फरशी बसविण्याच्या कामासाठी हजारी प्रसाद (रा.मोतीपुरा, शिखर, रूपगड राजस्थान) यास बोलाविले होते. तो एक महिन्यापासून काम करत होता. २३ जानेवारीला आम्ही सर्वजण शेतात कामाला गेलो असता, सायंकाळी पाच वाजता घरी आलो असताना जुन्या घराचा दरवाजा उघडा दिसला व त्यावेळी घरातील कपाटातून तीन तोळे सोन्याचे मंगळसुत्र, एक तोळ्याची ठुसी व अर्ध्या तोळ्याचे झुबे असा १ लाख २० हजार रूपयाचा ऐवज चोरून हजारी प्रसाद पळून गेला आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपपास पोलीस निरीक्षक विनायक माहुलकर हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!