पाणंद रस्ता खुले करण्याची मोहीम राबवा - शिवसेना उपजिल्हाप्रमुख शाहूदादा फरतडे याची मागणी. -

पाणंद रस्ता खुले करण्याची मोहीम राबवा – शिवसेना उपजिल्हाप्रमुख शाहूदादा फरतडे याची मागणी.

0

केम (संजय जाधव)- शिव व पाणंद रस्ते खुले करण्यासाठी महसूल भूमि अभिलेख, पोलीस यांनी एकत्र येऊन मोहीम राबवावी व तालुक्यातील शेतकऱ्यांचे तंटे सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शाहूदादा फरतडे यांनी तहसीलदार यांना निवेदना द्वारे केली आहे.

या निवेदनात फरतडे यांनी म्हणले आहे की शेतरस्त्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असुन दिवसेंदिवस फौजदारी स्वरूपाच्या घटना वाढत चालल्या असुन भावभावकीत, शेतकऱ्यांमध्ये शेत रस्त्यांच्या कारणामुळे  आपापसात तंटे घडत आहेत. शेतकर्‍यांच्या शेतीला दळणवळणासाठी रस्त्याच्या अडचणी निर्माण होत आहेत. त्यासाठी गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडीवाट, रस्ते, पाणंद, पांदण, शेतरस्ते, शिवार रस्ते, शेतावर जाण्या-येण्याचे रस्ते खुले करण्यासाठी पोलीस, भुमीअभिलेख यांच्या सहकार्याने विशेष मोहीम राबवली जावी.  तसेच   रेशनकार्डधारकांसाठी ई-केवायसी करण्याची मार्गदर्शक तत्त्वे लागू केली होती. त्यात सर्व रेशनकार्डधारकांनी ई- केवायसी करणे अनिवार्य होते. त्यासाठी आता शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२४ आहे. परंतू अनेक ठिकाणी  नेटवर्क नसणे सर्व्हर डाऊन होणे या मुळे अनेक रेशनकार्ड धारक ई केवायसी पासुन वंचित आहेत त्यांना धान्य मिळणे मुश्कील होणार आहे त्यासठी ई केवायसी करण्यास  ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी तसेच  अंत्योदय योजनेचे अनेक प्रस्ताव दाखल आहेत तरी शिल्लक असलेल्या इष्टांकाची पडताळणी करून नवीन लाभार्थ्यांना अंत्योदय योजनांतर्गत धान्य पुरवठा केला जावा,  नोव्हेंबर २०२३ मधील अतिवृष्टीत नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांना मंजूर यादी व सुधारित यादीत नावे असून देखील पैसे भेटले नाहीत अशा शेतकऱ्यांना तात्काळ  अनूदान मिळवून द्यावे इत्यादी मागण्या केल्या आहेत.

या मागण्यांबाबत योग्य ती कार्यवाही न झाल्यास भविष्यात तालुक्यातील नागरींकाना सोबत घेऊन तिव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख शाहूदादा फरतडे यांनी दिला. यावेळेस उपतालुकाप्रमुख अ‍ॅड विकास जरांडे, विभाग बालाजी वाडेकर ,ओंकार कोठारे,  भाऊराव मस्तूद,  बालाजी देवकर, यांच्यासह शेतकरी व शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!