केम केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – काल (दि.२६) केम येथील श्री ऊत्तरेश्वर माध्यमिक विद्यालयात केम केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाली. सुरुवातीला शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्याचे पूजन केम केंद्राचे केंद्रप्रमुख श्री महेश्वर कांबळे यांनी केले..
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालाचे मुख्याध्यापक कदम एस बी यांनी केले शिक्षण परिषदेला उपस्थित असलेले केंद्रप्रमुख श्री महेश्वर कांबळे सर,केम केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक श्री चट्टे, दोंड वस्तीचे मुख्याध्यापक श्री तळेकर, श्री वाघमोडे आश्रम शाळा केम,श्रीमती पाटेकर, श्रीमती शिंदे यांचा सत्कार प्रशालेचे मुख्याध्यापक कदम एस.बी तसेच प्रशालेचे सहशिक्षिका पी.के राऊत ,पी.ए गाडे यांनी केला तसेच शिक्षकांचे स्वागत केले शिक्षण परिषदेचे प्रास्ताविक प्रशालेचे सहशिक्षक जी.के जाधव यांनी केले श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे शिक्षण क्षेत्रातील योगदान खूप मोलाचे आहे असे मत मुख्याध्यापक कदम एस.बी यांनी व्यक्त केले.
शिक्षण परिषदेत PGI बाबत श्री प्रताप भोसले यांनी मार्गदर्शन केले.निपुण भारत या विषयावर श्री सतीश कळसाईत सर यांनी मार्गदर्शन केले माता पालक गट निर्मिती, यु डायस प्लस, प्रधानमंत्री शक्ती पोषण आहार योजना, केंद्रस्तरीय, आंतरशालेय क्रीडा स्पर्धा, व्हिडिओ स्पर्धा, या सर्व विषयांवर केंद्रप्रमुख श्री महेश्वर कांबळे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले तसेच सूचनाही दिल्या या शिक्षण परिषदेला केम केंद्रातील बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते.