तालुक्यातील विजेचे प्रश्न माझ्या कार्यकाळात सर्वात जास्त सुटले – संजयमामा शिंदे

करमाळा(दि.२९): 2004 ते 2019 या काळात तालुक्यात तीन वेगवेगळे आमदार होते. त्या काळात वीज समस्येवर फारशी ठोस कामे झाली नाहीत, मात्र 2019 ते 2024 या माझ्या आमदारकीच्या कालावधीत तालुक्यासाठी तीन नवीन सबस्टेशन मंजूर करून घेतली आणि जवळपास 15 सबस्टेशनची क्षमता वाढवली. तालुक्यातील वीज प्रश्न आपल्या कार्यकाळात सर्वात जास्त सोडविण्यात यश मिळाले असल्याचे प्रतिपादन माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी केले.

राजुरी येथील 33/11 केव्ही नव्याने बांधलेल्या सबस्टेशनच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे होते. यावेळी नंदकुमार जगताप, आर.आर. साखरे यांनी ग्रामस्थांच्या वतीने संजयमामा शिंदे यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला व त्यांचे आभार व्यक्त केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, माझ्याकडे आमदारकी नसली तरी तालुक्यातील विकासकामे सुरूच राहणार… तुम्ही निश्चिंत रहा,” असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

यावेळी जेष्ठ नेते वामनदादा बदे, ॲड. नितीनराजे भोसले, सतीशबापू शेळके, जिल्हा दूध संघाचे संचालक अशोक पाटील, चिखलठाण गावचे माजी सरपंच चंद्रकांतकाका सरडे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष राजेंद्रभाऊ बारकुंड, वाशिंबे गावचे सरपंच तानाजीबापू झोळ, युवा नेते अजिंक्य पाटील, उध्दवदादा माळी, डॉ. गोरख गुळवे, भरत आप्पा खाटमोडे, निळकंठ अभंग साहेब, युवा नेते आण्णासाहेब पवार, राजेंद्र बाबर, अशोक तकीक, अनिल शेजाळ, अनिल केकान, सचिन गावडे,

शंकर कवडे, उदय पाटील, पै. उमेश इंगळे, बापू तांबे, स्वप्निल पाडूळे, नंदकुमार जगताप साहेब, आर.आर. बापू साखरे, संजय साखरे, भाऊसाहेब साखरे, उदय साखरे, नवनाथ दुरंदे, आत्माराम दुरंदे, आप्पा निरगुडे, धनंजय जाधव, संजय साखरे, सुनिल पाटील, नवनाथ साखरे, आप्पा टापरे, वसंत भोईटे, दादा साखरे, संदिपान साखरे, आबा साखरे, दत्तू बोबडे, डॉ. फाळके, विठ्ठल देशमुख, प्रविण साखरे व ग्रामस्थ उपस्थित होते.


