आजोळी आलेल्या मुलीस पळवून नेले

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा येथे किल्लावेसीत आजोळास आलेल्या साडेतेरा वर्षे वयाच्या मुलीस कमलादेवीच्या यात्रेतून फुस लावून पळवून नेण्यात आले आहे. हा प्रकार १ डिसेंबरला मध्यरात्री घडला आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.

त्यात तिने म्हटले आहे, की मी माझ्या माहेरी किल्लावेसीत देवीच्या यात्रेकरीता आले होते. ३० नोव्हेंबरला रात्री साडेदहा वाजता माझी मुलगी माझ्या नातेवाईकासह यात्रेत गेली होती. मध्यरात्रीच्या सुमारास ती गायब झाली. त्यानंतर शोधाशोध घेऊनही तिचा शोध लागला नाही. यावरून तिला कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेले आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.



