केममध्ये विराट हिंदू संमेलन उत्साहात संपन्न

केम (संजय जाधव) : केम (ता.करमाळा) येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने २८ मार्च रोजी सायंकाळी शिवशंभू वेशीजवळ विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ६ ते ८ या वेळेत पार पडलेल्या या संमेलनास नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली.
या संमेलनासाठी ह.भ.प. लिंबाजी तिडके महाराज (परळीकर), हिंदू पुनरुत्थान सभेचे प्रस्थापना प्रमुख महेश केदार तसेच श्री उत्तरेश्वर देवस्थानचे महंत जयंतगिरी महाराज जगताप उपस्थित होते.

यावेळी महेश केदार यांनी आपले विचार मांडताना विविध सामाजिक व ऐतिहासिक मुद्द्यांवर भाष्य केले. त्यांनी सांगितले की, कोणत्याही धर्मातील व्यक्तींविरोधात नसून काही तत्त्वज्ञानांबाबत मतभेद आहेत. तसेच ऐतिहासिक घटनांचा संदर्भ देत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.


या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाचे केदार यांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंदवे गुरुजी यांनी केले, तर आभार प्रदर्शन बबलू पाटील यांनी मानले. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

