पांगरे येथील तरुणाचा प्रामाणिकपणा – खात्यावर चुकून आलेले ५० हजार रुपये केले परत

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – आजच्या युगात अनेकजण लोकांना विविध प्रकारे फसवत असल्याचे निदर्शनास येत असतानाच पांगरे (ता. करमाळा) येथील महेश शेळके या शेतकरी तरुणाने मात्र स्वतःच्या अकाउंटवर चुकून जमा झालेले पन्नास हजार रुपये क्षणाचा विलंब न करता फोन करून स्वतःहून परत पाठवले.
याबाबत हकीकत अशी की, केळी व्यापारी महेश वाघे यांच्या नातेवाईकाकडून चुकून महेश या सारख्या नावामुळे महेश शेळके यांच्या अकाउंट वर 50 हजार रुपये पाठवण्यात आले होते परंतु ते पैसे आपले नसल्याचे निदर्शनास येतात महेश शेळके यांनी लगेच श्री वाघे यांना फोन करून पैसे पुन्हा रिटर्न वाघे यांना पाठवले. पांगरे परिसरातील शेतकऱ्यांकडून महेश यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे. महेश शेळके गावातील सर्व सामाजिक कार्यात ही अशाच प्रकारे अग्रेसर असतात.त्यांचे सरपंच प्रा. डाॅ. विजया सोनवणे,वकील संघाचे अध्यक्ष व आदिनाथ चे माजी संचालक अॅड. दत्तात्रय सोनवणे यांनी विशेष अभिनंदन केले.
फक्त प्रामाणिक पणे, ईमाने ईतबार वागायचं आयुष्यात काहीच कमी पडत नाही, अशी प्रतिक्रिया महेश शेळके यांनी संदेश शी बोलताना दिली.


