केम विकास कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध – जगताप गटाने पुन्हा एकदा राखली सत्ता
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – केम येथील विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली असून पुन्हा एकदा ही सोसायटी जगताप गटाच्या ताब्यात गेली आहे. गेल्या ३२ वर्षांपासून ही सोसायटी जगताप गटाच्याच ताब्यात आहे.
सोसायटी संचालक मंडळाची निवडणूक दि २० नोव्हेंबर झाली. दाखल झालेल्या १३ नामनिर्देशन पत्रापैकी सर्व पत्र मंजूर करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उमेश बेंढारी यांनी काम पाहिले. हि निवडणूक बिनविरोध होण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सागर दोंड, दिलीप दोंड, बाळासाहेब देवकर विष्णू पारखे यांनी प्रयत्न केले
- निवडणून आलेले सभासद पुढील प्रमाणे–
- सर्व साधारण कर्जदार गट – दिलीप गोविंद दोंड, आनंद मकरंद शिंदे, दत्तात्रय बिचितकर, दयानंद सजेंराव तळेकर, विलास बिचितकर,किरण तळेकर रमेश कांतीलाल तळेकर चंद्रकांत अभिमान दोंड, महादेव विष्णू पारखे,
- कर्जदार मागास प्रवर्ग गट – बाळासाहेब विश्वनाथ देवकर,
- भटक्या विमुक्त जाती प्रवर्ग – नवनाथ सोमनाथ कोळेकर
- अनुसूचित जाती प्रवर्ग – सुमित सुरेश ओहोळ
- कर्जदार सर्व साधरण महिला – कौशल्या सागर दोंड, सारिका भिमराव दोंड
या सोसायटीचे चेअरमन व व्हाइस चेअरमन कोण होणार या कडे केम ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. बाळासाहेब देवकर हे केम सोसायटीचे मावळते चेअरमन होते.