उत्तरेश्वर देवस्थानची यात्रा मोठया उत्साहात संपन्न

केम(संजय जाधव) : करमाळा तालक्यातील सर्वात मोठी समजली जाणारी केम येथील जागृत ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर देवस्थानची यात्रा मोठया उत्साहात संपन्न झाली.
या यात्रेला महाशिवरात्री पासून प्रारंभ झाला होता या निमित्त मंदिरात श्रीस, अभिषेक, शिवलिलामृत पारायण, लघुरूद्राभिषेक, श्रीस दडंवत, ब्राह्मणभोजन, हरिकीर्तन, जागर, निशीथा, लघुरूद्राभिषेक असे नित्यनेम धार्मिक कार्यक्रम पार पडले.
उत्तरेश्वर देवस्थानची यात्रा पाच दिवस चालते. महाशिवरात्रीपासून या यात्रेस सुरवात होते. २ मार्चला ही यात्रा संपली. या पाच दिवसांमध्ये धार्मिक कार्यक्रम, छबिना, रक्तदान शिबिर,कुस्त्यांचा आखाडा आदी कार्यक्रम घेतले जातात. यात सर्व समाजाला मान दिला जातो. त्यामुळे सर्व जाती धर्माचे लोक या यात्रेत मोठ्या उत्साहाने सहभाग घेत असतात.
शनिवार दि. १ मार्च रोजी श्रीचा भव्य छबीना काढण्यात आला. या छबीन्यासमोर नयनरम्य असे शोभेचे दारू काम झाले. यावेळी हा छबीना पाहण्यासाठी यात्रेकरुंची गर्दी झाली होती. या शोभायात्रेची मिरवणूक गावातून तब्बल सात तास चालली. सकाळी सात वाजता छबीना मंदिरात आला. या नंतर श्रीची आरती होऊन या शोभायात्रेची सांगता झाली.

यावर्षी यात्रा मोठया प्रमाणावर भरली होती. या यात्रेसाठी बाहेर असणारे पुणे,मुंबई व इतर ठिकाणी देखील नागरिक येत असतात. या यात्रेत मिठाईची दुकाने, वेगवेगळया प्रकारची खेळणी दुकाने मनोरंजक मोठे पाळणे,जंपीग बॉक्स,मिठी हाॅऊस, फिरती विमाणे, चक्र असी खेळणी आली होती. याचा बाल गोपाळांनी आनंद लुटला.

या यात्रेत प्रहार संघटनेचे तालुकाप्रमुख सागर पवार यांनी आपल्या बजरंगी खोंडाची हलगी वाजवत ही मिरवणूक कढली. ही मिरवणूक मंदिरात आल्यानंतर देवस्थानचे महंत जयंत गिरी महाराज यांच्या हस्ते या खोंडाजी पूजा करण्यात आली.

या यात्रेत गर्दीचा फायदा घेत अनेक चोरट्यांनी आपला हात देखील साफ करून घेतल्याचे समोर आले. बऱ्याच महिलांचे दागिणे चोरीला गेले. पोलीस मात्र यासाठी कमी पडले असल्याचे दिसून आले.
या यात्रेसाठी केम ग्रामपंचायतीकडून चांगले नियोजन करण्यात आले होते. यात्रा असलेल्या ठिकाणी चार दिवस पाणी मारले होते त्यामुळे यात्रेकरूंचे धुळीपासून संरक्षण झाले. तसेच वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था, फिरते शौचालय अशा सुविधा देण्यात आल्या. या सर्व कामावर सरपंच सुवर्ण कोरे यांचे जातीने लक्ष होते. त्यामुळे यात्रेकरूंनी ग्रामपंचायतचे कौतुक केले.
ही यात्रा पार पाडण्यासाठी देवस्थानचे चेअरमन दादासाहेब गोडसे, सचिव मनोज सोलापरे,सदस्य विजय तळेकर, भाऊसाहेब बिचितकर,मोहन दोंड,येवले अरूण, वासकर, दाऊद शेख, सर्व गुरव मंडळी व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.





