सोलापूर येथे पार पडलेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये करमाळा कोर्ट संघाने प्रथम पारितोषिक व ‘चषक’चा मान मिळवला

करमाळा / संदेश प्रतिनिधी : सोलापूर कोर्ट प्रीमियर लीग,सोलापूर येथे 19, 25 व 26 जानेवारी रोजी पार पडलेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये करमाळा कोर्ट संघाने प्रथम पारितोषिक व चषक याचा मान मिळवला. सदर स्पर्धा ही सोलापूर कोर्टकर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केली होती.
या स्पर्धेमध्ये सोलापूर शहर न्यायालीन कर्मचारी व न्यायाधीश साहेब सोलापूर तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कोर्टकर्मचारी तसेच न्यायाधीश व प्रत्येक तालुक्यातील दोन ॲडव्होकेट सदस्य अशा प्रकारे प्रत्येकी संघामध्ये मिळून सदरील स्पर्धेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील न्यायमूर्ती यांचा संघ मिळून एकूण 16 संघामध्ये रोमांचक स्पर्धा पार पडली.
या स्पर्धेमध्ये करमाळा कोर्ट संघाने सोलापूर येथील डिस्टिक डायमंड सोलापूर संघावरती फायनल मध्ये मात करून, पहिल्या क्रमांकाचे रोख स्वरूपातील रक्कम व मानाचा चषक हे विजेतेपद पटकावलं.
या स्पर्धेमध्ये करमाळा कोर्टाकडून स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून तसेच सेमी फायनल मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार ॲड.अमर शिंगाडे व फायनल मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्कार कोर्ट कर्मचारी मधुसूदन धोत्रे व क्वॉटर फायनल मॅच मध्ये मॅन ऑफ दि मॅचचा पुरस्कार कोर्ट कर्मचारी संतोष उडचण तसेच संपूर्ण स्पर्धेमध्ये कर्णधार सचिन कोकरे, शशिकांत शेजुळ, अमोल राऊत, संतोष ओघे, सज्जन यादव, महांतेश कुंभार, ॲड.शिवराज शेरे, अक्षय बारस्कर, बालाजी कोंडेकर आदीनी सामन्यासाठी मोठे योगदान दिले आहे.
या स्पर्धेत करमाळा कोर्ट चषकाचा पुरस्कार मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पृथ्वीराज जी चव्हाण तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती फिरदोश पुन्नीवाला व सोलापूर जिल्हा न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सलमान आझमी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला याप्रसंगी जिल्ह्यातील सर्व न्यायमूर्ती व कर्मचारी उपस्थित होते.






