कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी करमाळ्यात निघाला मोर्चा -

कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी करमाळ्यात निघाला मोर्चा

0

केम(संजय जाधव): – करमाळ्यात काल (दि. १९ ऑगस्ट) कर्जमाफी व विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला. बहुजन संघर्षनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्च्यास माजी मंत्री बच्चु कडू यांच्या “शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे” या मागणीला पाठिंबा देण्यात आला.

मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आली. पावसाचे वातावरण असूनही शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. तहसील कचेरीवर धडक दिल्यानंतर राजाभाऊ कदम यांनी भाषण करताना सरसकट कर्जमाफी, केळीच्या रोपांची कंपनीदराने उपलब्धता, रेशन कार्डधारकांना धान्य, संजय गांधी योजनेचे थकीत लाभ, तसेच तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेची कामे गतिमान करण्याच्या मागण्या जोरदारपणे मांडल्या.

तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. त्यांनी सांगितले की, केळीच्या रोपांच्या किमतीबाबत एजंट, कृषी अधिकारी व शेतकरी प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेऊन कंपनीच्या दराने रोपे उपलब्ध करण्याचे निर्देश दिले जातील. तसेच रेशनधारकांच्या नावे अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करण्यासाठी आणि पुरवठा विभागातील प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी वरिष्ठांना कळविण्यात येईल.

मोर्चादरम्यान मार्केट कमिटीचे संचालक शंभूराजे जगताप, माजी उपसभापती दत्ता सरडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष वारे, प्रहार संघटनेचे संदीप तळेकर यांनीही भाषणे केली. यावेळी विविध राजकीय, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

मोर्चात सहभागी व्यक्ती :

मोर्चामध्ये आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक दत्तात्रय गव्हाणे, पोत्रे सरपंच अंकुश शिंदे, माजी सभापती गहिनीनाथ ननावरे, प्रवीण ओहोळ, बाबा घोडके, युवा नेते प्रफुल्ल कदम, अंगद लांडगे, तुकाराम घोंगडे, कालिदास कांबळे, अनिल कांबळे, खातगाव सरपंच अविनाश मोरे, आदिनाथ कोकरे, तात्या काळे, मच्छिंद्र गायकवाड, दत्ता राक्षे, अतुल राक्षे, सतीश राक्षे, महादेव कडाळे, बिबीशन खरात, अतुल चव्हाण, कल्याण कोठावळे, संदीप मरकड, किसना हरणावळ, इसाक शेख, जुबेर शेख, नितीन मारकड, श्याम गायकवाड, बापू गायकवाड

मारुती भोसले, आप्पा भोसले, अर्जुन भोसले, बाबासाहेब कोपनर, प्रदीप धेंडे, सुनील गरड, राजेंद्र कांबळे, शिवाजी कुंभार, जितेंद्र लांडगे, हनुमंत खरात, राहुल खरात, सुभाष जरांडे, बबन भालेराव, सुधाकर पवार, लहू भालेराव, अमोल भोसले, सोमनाथ देवकते, सोमनाथ गुरव, नामदेव कोठावळे, राजू सरतापे, मारुती जंजाळ, प्रवीण कांबळे, आबा गरड, पांडू शिंदे, भाऊ हजारे, कुंडलिक चोरमले, भीमा रंधवे, सुभाष गायकवाड, मयूर शिंदे, प्रेमचंद कांबळे, परमेश्वर पोळ आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!