माणुसकीचे नाते दृढ होण्याची गरज- प्रा. सुहास गलांडे

करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.८: अलीकडे च्या कालावधीमध्ये विज्ञान युगाने खूप मोठी प्रगती केली आहे.पण विज्ञानाचे अपयश म्हणजे माणसातील माणुसकी कमी होत चाललेली आहे. आज खऱ्या अर्थाने सर्व काही असताना सुद्धा माणसातील माणूसपण हरवत चाललेला असल्याने, माणसातील माणुसकी जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. ते काम ग्रामसुधार समितीच्या “जिव्हाळा” ग्रुपच्या माध्यमातून होत आहे असे मत प्रसिद्ध वक्ते प्रा. सुहास गलांडे यांनी व्यक्त केले.

पांगरी येथील लोकविकास डेअरी वर लोकविकासचे संस्थापक दीपक आबा देशमुख यांनी आमंत्रित केलेल्या “जिव्हाळा मेळाव्यात” प्रा. गलांडे बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की आज खऱ्या अर्थाने सर्व काही सहज उपलब्ध होत आहे .आज अन्न,वस्त्र, निवारा,शिक्षण सर्व काही सहज उपलब्ध झाले आहे.असे असले तरी आज घराघरातील असणारा जो संवाद आहे नात्यातील दुरावा वाढत चाललेला आहे. परिवारामध्ये समाधान नाही आणि यामुळे कुठेतरी माणसातली माणुसकी हरवत चाललेली आहे ही माणुसकी निर्माण करणं, माणसातला माणूस जागा करणं ही मोठी गरज निर्माण झालेली आहे. ती गरज जिव्हाळ्याच्या माध्यमातून पूर्ण होत आहे,हे निश्चितच महत्त्वाचे आहे.

यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक हरिदास डांगे यांनी समाजातील हे जे चित्र आहे हे चित्र बदलत चालले असून आता बदलत्या समाजाला चांगले विचाराची मोठी गरज आहे.हरवणारी संस्कृती पुन्हा एकदा निर्माण करणं आवश्यक आहे.सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेठ खाटेर यांनी जिव्हाळा ग्रुप च्या माध्यमातून सर्व सामान्य व्यक्तीच्या समस्या सोडवल्या जाव्यात व तशी समिती स्थापन करावी असे आवाहन केले.


समाजातलं चांगुलपणा हा अधिक दृढ व्हावा, व्यक्तीतील असणारे सद्गुण आणि छंद आधोरेखीत व्हावेत, त्याचबरोबर व्यावसायिकता वाढावी व एक दिवस स्वत:साठीच काढला जावा यासाठी हा ग्रामसुधार ने जिव्हाळा ग्रुप निर्माण केला आहे.सर्वसामान्यांच्या गरजा ,त्याच बरोबर वैचारिक व्यासपीठ आणि मित्रांचा स्नेह मेळावा घडला जावा ही यातील मुलभूत संकल्पना आहे. यासाठी प्रा.शिवाजीराव बंडगर, महेंद्र पाटील, दीपकआबा देशमुख, डाॅ. सुभाष सुराणा, हरिदास डांगे, श्रेणिकशेठ खाटेर यांचे मोठे योगदान मिळाले आहे. सर्वसामान्यांना समस्या निर्माण होतात त्या समस्या सोडवण्यासाठी यावेळी समिती स्थापन करण्यात आली त्यामध्ये श्रेणिकशेठ खाटेर, प्रा. शिवाजीराव बंडगर ,दीपकआबा देशमुख ॲड.डॉ. बाबुराव हिरडे व प्राचार्य नागेश माने यांचा समावेश आहे.पुढील मेळावा डॉ.सुभाष सुराणा यांच्या माध्यमातून जेऊर येथील आनंद पत संस्थेत ११ जानेवारी २०२६ ला होणार आहे.
डॉ.ॲड. बाबूराव हिरडे

यावेळी प्रा. डॉ. संजय चौधरी, प्रा. शिवाजीराव बंडगर, डाॅ. सुनिता दोशी, ॲड. सविता शिंदे,महेंद्र पाटील,ज्येष्ठ कवी प्रकाश लावंड प्राचार्य नागेश माने ,पंडित रोकडे सर तसेच अनिल माने, राजेंद्र साने
माधुरी साखरे,प्राचार्य निवृत्ती सुरवसे, राजेंद्र रणसिंग, प्रा. शहाजीराव देशमुख ,सुहास डांगे यांची यावेळी भाषणे झाली.
या कार्यक्रमांमध्ये दिगंबर साळुंखे विठ्ठल शेळके ,संजय हांडे,ॲड. दत्तात्रय सोनवणे,नाथाजीराव शिंदे, अरुण धुमाळ, प्रतापराव बागल ,भूषण लुंकड,उद्योजक दत्तात्रय पवार,संतोष घोगरे,कैलास अण्णा लबडे ,विलास लबडे नानासाहेब साळुंखे, वैभव पोळ, प्रशांत नाईकनवरे महावीर निंबाळकर ,रावसाहेब देशमुख भारत रोकडे ,भागवत पाटील ,बबन देशमुख, दीपक देशमुख ,संजय देशमुख ,अरुण शेंडगे, डॉ. विक्रम बेंद्रे विठ्ठल केकान ,तात्या कळसाईत, तानाजी देशमुख, सुधीर देशमुख, विजय देशमुख ,जालिंदर पांढरभिसे, विक्रम शहा ,तुकाराम पाटील, कल्याण मंगवडे, राजू घोडके ,अमित परदेशी, उत्तरेश्वर कोपनर ,पत्रकार दिनेश मडके,समाधान देशमुख ,गणेश पाटील, सचिन पिसाळ ,प्रवीण घोगरे , मुथा अबॅकस च्या प्रा. ज्योती मुथा, माधुरी साखरे , रेश्मा जाधव, डाॅ. जाधव , सेवानिवृत्त मुख्याध्यापक दादासाहेब झिंजाडे आदीजण उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात व समारोप सेवानिवृत्त शिक्षक लक्ष्मण लष्कर यांच्या विविध गीताने केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक आबा देशमुख यांनी केले तर सूत्रसंचालन पत्रकार गजेंद्र पोळ यांनी केले तर आभार भूषण लुंकड यांनी मानले.
यावेळी सर्व सदस्यांना लोकविकास डेअरीचा उद्योग कसा चालतो ,याची सर्व माहिती डेअरी प्रकल्प दाखवून दिपकआबा देशमुख यांनी दिली
