करमाळा तालुका पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी मोटे तर उपाध्यक्षपदी दामोदरे यांची निवड -

करमाळा तालुका पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी मोटे तर उपाध्यक्षपदी दामोदरे यांची निवड

0

करमाळा : करमाळा तालुका पत्रकार संघ (सक्रिय)ची नवी कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी शितलकुमार मोटे तर उपाध्यक्षपदी प्रफुल्ल दामोदरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. पत्रकारांच्या हक्कांसाठी संघटितपणे काम करणे, तालुक्यातील पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावणे असा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला.

संघाचे ज्येष्ठ सल्लागार व मार्गदर्शक म्हणून ॲड. डॉ. बाबुराव हिरडे, जयंत दळवी, आलिम शेख, अशपाक सय्यद आणि किशोरकुमार शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघ अधिक गतिमानपणे कार्य करणार असल्याचे सांगण्यात आले.

कार्याध्यक्षपदी सिद्धार्थ वाघमारे, प्रवक्तेपदी आण्णासाहेब काळे, सचिवपदी ॲड. विशाल घोलप, सहसचिवपदी ॲड. सचिन हिरडे, प्रसिद्धी प्रमुखपदी राजाराम माने, संघटकपदी शेखर स्वामी तर संपर्क प्रमुखपदी नाना पठाडे आणि संजय चौगुले यांची निवड करण्यात आली आहे.



संघाच्या सदस्यांमध्ये विशाल परदेशी, राजेश गायकवाड, उमेश पवळ, गणेश जगताप, अंगद भांडवलकर, हर्षवर्धन गाडे, गजेंद्र पोळ, सुनील भोसले, विजय निकत, जयंत कोष्टी, धर्मराज दळवे, प्रशांत भोसले, प्रवीण अवचर, गौरव मोरे, सुयोग झोळ, अतुल बोकन, हरिभाऊ हिरडे, दस्तगीर मुजावर, नंदकुमार वलटे, संजय जाधव, बाळासाहेब सरडे, धनंजय निर्मळ आणि रणजीत शिंदे यांचा समावेश आहे. नूतन कार्यकारिणीचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

अध्यक्ष शितलकुमार मोटे हे गेले अनेक वर्षापासून TV9 मराठी या वाहिनीचे सोलापूर व धाराशिव जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. उपाध्यक्ष प्रफुल्ल दामोदरे हे दैनिक पुण्यनगरी चे करमाळा तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!