सातोली शाळेला रुजू झालेल्या नवीन शिक्षकाचा ग्रामस्थांकडून सत्कार संपन्न

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – सातोली (ता.करमाळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला एका शिक्षकाची कमतरता होती. जि.प.शाळेला एक शिक्षक द्यावा अशी मागणी पालक वर्ग, शाळा व्यवस्थापन समिती कडून होत होती. अखेर नवीन शिक्षकाची नेमणूक झाली असून त्यांचा सत्कार सातोली ग्रामस्थांच्या वतीने शाळेत करण्यात आला.
सातोली येथील जि.प.शाळेत दोन शिक्षक कार्यरत होते. ६१ ते ९० पटसंख्या असल्यानंतर तिसरा शिक्षक देणे अनिवार्य असते. या शाळेची पटसंख्या ६७ असून या शाळेत इ.१ ते ५ वर्ग आहेत. परंतू या शाळेत दोनच शिक्षक कार्यरत होते. या शिक्षकावर विद्यार्थ्यांचा भार पडत होता. तसेच एखादे शिक्षक सुट्टीवर असतील तर दुसऱ्या शिक्षकांना पाचही वर्ग सांभाळणे अवघड जात होते. नवीन शिक्षक मिळण्यासाठी अमर साळुंखे यांनी गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन पाठपुरावा केला होता.
त्यानंतर श्री. लोणकर यांची शाळेला नेमणूक करण्यात आली. याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराच्या वेळी उपस्थित मान्यवर युवा नेते अमर साळुंखे संदीप साळुंखे खूपसे, नितीन मुटेकर रोहिदास साळुंखे प्रमोद साळुंखे, गणेश साळुंखे, कोडलिंगे सर माने सर अनिल साळुंखे ,अशोक मोटेकर आदि उपस्थित होत. शिक्षक मिळल्याने पालकवर्गाने अमर साळुंखे यांच्यासह संदीप तळेकर संदीप साळुंखे गणेश गाडे योगेश गाडे महादेव वाघ आदींचे आभार मानले.