करमाळ्यात उद्या बांधकाम कामगारांना साहित्याचे वाटप -

करमाळ्यात उद्या बांधकाम कामगारांना साहित्याचे वाटप

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरु असलेल्या व शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना उद्या (ता.३०) रोजी सकाळी १० वाजता साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. या साहित्याचे वाटप ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष व जेष्ठ पत्रकार डॉ.ॲड.बाबूराव हिरडे यांचे हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमासाठी करमाळा तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित राहणार आहेत, हा कार्यक्रम करमाळा शहरातील श्री देवीचामाळ रोडवरील मुक्ताई गारमेंट येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना महिला आघाडी जिल्हा उपप्रमुख ज्योतीताई शिंदे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!