2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी : जुनी पेन्शन संघटनेच्यावतीने आमदार, खासदारांना पोस्टाने निवेदन..
करमाळा/ संदेश प्रतिनिधी :
करमाळा : 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना 1982- 84 जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी सोलापूर जिल्हा जुनी पेन्शन संघटनेच्यावतीने आपल्या महाराष्ट्रातील 288 विधानसभेचे आमदार व 48 लोकसभेचे खासदार त्याचबरोबर राज्यसभेचे खासदार व 78 विधान परिषदेचे आमदार तसेच सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख यांना पोस्टाने निवेदन पाठवले आहे.
हा उपक्रम शिक्षक दिनाच्या निमित्ताने सुरू केलेला आहे, सर्व मान्यवर आमदार, खासदार, मंत्री तसेच सर्व पक्ष प्रमुख यांनी आमच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी ही विनंती आज करमाळा तालुका जुनी पेंशन संघटनेच्या वतीने पोस्टात निवेदनाची पत्रे पाठवली आहेत.
याप्रसंगी संघटनेचे तालुकाध्यक्ष अरूण चौगुले, सतिश चिंदे, अजित कणसे, साईनाथ देवकर, विनोद वारे, प्रताप राऊत, मारूती ढेरे, मुचकुंद काळे, प्रसाद कुलकर्णी, सुधीर माने, श्रीकृष्ण भिसे, उदय काटुळे, अशोक दुधे, सखाराम राऊत व जुनी पेंशन संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.