केम येथील ऊत्तरेश्वर देवस्थानच्या यात्रेस २६ फेब्रुवारीपासून सुरवात - यात्रेची तयारी पूर्ण - Saptahik Sandesh

केम येथील ऊत्तरेश्वर देवस्थानच्या यात्रेस २६ फेब्रुवारीपासून सुरवात – यात्रेची तयारी पूर्ण

केम (संजय जाधव): केम (ता. करमाळा) येथील जागृत ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वरबाबाची यात्रा महाशिवरात्री पासून (दि.२६) सुरूवात होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. यामध्ये शिवलीलामृत ग्रंथ पारायण, लघुरुद्राभिषेक, कीर्तन, हरीजागर,श्रीस नैवेद्य, ब्राह्मण भोजन  श्रीस अभिषेक असे नित्यनेमाने धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

दि २६ रोजी सकाळी ९ ते ११ शिवलिलामृत पारायण, रात्री ९ ते ११ ह.भ.प. सुरेश महाराज थिटे यांचे कीर्तन, रात्री  महाशिवरात्री निशीथ काली लघुरूद्राभिषेक, दि २७ रात्री ९ ते ११ ह.भ.प. मोहन महाराज बेलापूर यांचे कीर्तन व रात्री ११ नंतर हरि जागर दि २८ रोजी रात्री ९ ते ११ ह.भ.प. गणेश भोरे यांचे कीर्तन व रात्री ११नंतर हरि जागर दि १ मार्च रात्री १२:०५ मी.श्री चा भव्य छबीना निघणार आहे. या छबिन्या समोर नयन रम्य असे शोभेचे दारु काम होणार आहे.

दि.२ मार्च रोजी रविवारी दुपारी १ नंतर मल्लांच्या जंगी कुस्त्याना नामांकित पैलवानाची हजेरी लागणार आहे.
या यात्रेसाठी ग्रामपंचायतीने जोरदार तयारी सुरू केली. छबीना प्रवेशव्दार ते मंदिर असा रस्ता तयार करण्यात आला आहे गाडयासाठी पार्किंगची सोय केली आहे. यात्रेकरूसाठी फिरते शौचालया,पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरची व्यवस्था केली आहे.

कार्यक्रम पत्रिका

छबीना रोडवर बल्ब बसविण्यात आले. या कामावर जातीने सरपंच कोरे पाहणी करत आहेत. या यात्रेसाठी केम, टेंभुर्णी केम, कुर्डुवाडी अशा जादा गाडया सोडाव्यात अशी मागणी देवस्थान ट्रस्टने करमाळा आगारप्रमुख यांच्याकडे केली आहे. यात्रा शांततेने पार पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्त चोख राहणार आहे. या यात्रेसाठी उत्तरेश्वर देवस्थान परिश्रम घेत आहे.

उत्तरेश्वर बाबाची यात्रा पाच दिवस सुरू असते. या यात्रेमध्ये मिठाई,गृहपयोगी वस्तू, लहान मुलांची खेळणी, खाद्यपदार्थ, आदी विविध प्रकारच्या वस्तू विक्रीचे स्टॉल्स लागले असतात. या यात्रेला करमाळा तालुक्यासह इतर जिल्ह्यातून देखील भाविक मोठ्या प्रमाणावर हजेरी लावत असतात.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Group