करमाळा शहरालगतच्या बायपासची दुरावस्था; खड्डे आणि चिखलाने वाहनचालक त्रस्त -

करमाळा शहरालगतच्या बायपासची दुरावस्था; खड्डे आणि चिखलाने वाहनचालक त्रस्त

0

करमाळा : करमाळा शहरालगतचा बायपास रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला असून वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मौलाली माळ ते जामखेड चौक दरम्यान ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचून रस्ता दलदलीसारखा झाला आहे. रस्त्याची साईड पट्टी उखडून चिखलाचा खच तयार झाल्याने वाहनचालकांना मोठ्या जिकरीने वाहन चालवावे लागत आहे. दुचाकीस्वार तर अक्षरशः जीव मुठीत धरून गाडी चालवत आहेत.

या मार्गावरून अहिल्यानगर व टेंभुर्णीकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते. स्थानिक नागरिक सुद्धा दररोज या रस्त्यावरून प्रवास करत असल्याने समस्या अधिक गंभीर झाली आहे. अवजड, मध्यम अवजड, हलकी वाहने तसेच दुचाकी अशा सर्व प्रकारच्या वाहनांना या रस्त्यामुळे फटका बसतो आहे.

छायाचित्र : सुभाष कांबळे

रस्ता दोन पदरी असल्यामुळे ओव्हरटेक करणे आधीच कठीण; त्यात खड्डे आणि चिखलामुळे वाहतूक अधिकच मंदावली असून अपघाताचा धोका वाढला आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने रस्ता दुरुस्त करून खड्डेमुक्त करण्याची तसेच साईड पट्टी व्यवस्थित करण्याची मागणी केली आहे.

या रस्त्यावरून दिवसभरात शेकडो वाहने प्रवास करतात. खड्ड्यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे.  पाऊस झाला की साईडपट्टीवर चिखल तयार होत असून वेळप्रसंगी गाड्या खाली उतरवता येत नाहीत त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन हा बायपास रस्ता दुरुस्त करून सुरक्षित करावा – इंजि.सुभाष कांबळे, करमाळा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!