श्रीशंभू छत्रपती राज्याभिषेक सोहळ्यात केम मधील युवकांकडे सजावटीची जबाबदारी
केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) – छत्रपती शंभूराजांचा ३४३ वा राज्याभिषेक सोहळा दि. १६ जानेवारी २०२४ रोजी रायगड येथे संपन्न होत आहे.
शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा समिती, रायगड च्या वतिने मागील नऊ वर्षांपासून हा सोहळा विविध संकल्पनेच्या माध्यमातून साजरा केला जातो. या वर्षी पोशिंदा राजा या संकल्पनेवर सोहळ्याचे आयोजन केले जाणार आहे, कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांच्या हस्ते यंदाचा राजाभिषेक संपन्न होणार आहे.
या सोहळ्यात समाधी स्थळी पूर्णवेळ सजावट सेवा करण्याची जबाबदारी केम येथील शिवभक्तांना देण्यात आली. केम साठी हा एक आनंदाचा क्षण आहे अशी भावना केम येथील शिवभक्तांनी व्यक्त केली.
या सोहळ्यासाठी केम येथील सिद्धार्थ शेलार, अभिजित तळेकर, समीर दादा तळेकर, गौरव नाईकनवरे, विशाल ओहोळ, मनोज तळेकर, निलेश पाटील,महेश गायकवाड, सचिन तळेकर,ज्ञानेश्वर तळेकर, अक्षय तळेकर, बापू वायभासे,राजाभाऊ तळेकर, दिनेश गायकवाड, महेश तळेकर, आबा दुर्गुळे ,शुभम मारवाडी यासह केम येथील ५० शिवभक्त रायगड ला रवाना झाले आहेत.