संप्रदाय ही समृद्ध परंपरा जपली पाहिजे : पाटील महाराज

करमाळा/संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.22) : आपली प्रतिज्ञा आहे, त्यात समृद्धतेने नटलेला परंपरेचा मला अभिमान आहे, असे जे म्हटले त्या मध्ये सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेमध्ये भजन हा एक समृद्ध प्रांत आहे. त्याला जतन करण्याची गरज आहे. त्यासाठी अशा स्पर्धा घेतल्याने या समृद्ध परंपरेला निश्चितच बळकटी मिळणार आहे,असे मत वासकर संप्रदायाचे प्रमुख ह.भ.प. विठ्ठल महाराज पाटील यांनी व्यक्त केले.
भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या तालुकास्तरावरील भजनस्पर्ध्येच्या शुभारंभावेळी ते बोलत होते.
यास्पर्धेचा प्रारंभ ह.भ.प. रणजित महाराज आरणगावकर,ह.भ.प. विठ्ठल महाराज पाटील,ह.भ.प. रामभाऊ महाराज निंबाळकर, डॉ.ॲड.बाबूराव हिरडे,भजन सम्राट बापूराव बागल,अर्जून महाराज बागल, दादामहाराज पालके, गायक-विजय महाराज खंडागळे,सचिन गटकुळ हिवरे, आप्पा भोगे,हरी शेळके,दस्तुरखुद्द गणेश चिवटे, ॲड. भगवान गिरी, विलासराव जाधव ,अण्णासाहेब सुपनवर, हनुमंत भांडवलकर आदींच्या उपस्थितीत झाला.
यावेळी ह.भ.प.रामभाऊ महाराज निंबाळकर,ज्ञानेश्वर महाराज फुले सर तसेच डॉ.ॲड.बाबूराव हिरडे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप महाराज ढेरे यांनी केले तर सूत्रसंचालन ह.भ. प. नाना महाराज पठाडे यांनी केले.
यावेळी विजय महाराज खंडागळे, ॲड.भगवान गिरी ,विलास महाराज जाधव, दादा महाराज पालके, सचिन गटुकळ,हानुमंत काळे,नंदकुमार घाडगे,संतोष बनाते,धनंजय शेळके, नितिन कानगुडे यांनी नियोजन केले. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव ,तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे ,बाळासाहेब कुंभार, मोहन शिंदे,अमोल पवार, नितीन झिंजाडे, विनोद महानवर,सोमनाथ घाडगे, किरण शिंदे , संजय किरवे, प्रकाश ननवरे आदीजण उपस्थित होते.
– गणेश चिवटे (संयोजक)
संतांच्या विचारातूनच समाजाची प्रगती होऊ शकते आपल्या तालुक्यातील महाराज मंडळी हे समाजाला जागृती चे काम करतात आणि ते आज या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्यामुळे निश्चित समाजाचे चित्र बदलले असणार आहे अशाच प्रकारच्या स्पर्धा भविष्यात भरविण्यासाठी मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करणार आहे. तालुक्यातील सर्वसामान्य गरीब अशा व्यक्तींच्या भोजनाची व्यवस्था करतो तसेच विद्यार्थ्यांच्या संध्याकाळचे जेवण आणि त्यांना भाजी देण्याचे प्रयत्न करतो. विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून मला काम करण्याची संधी आपण देत आहात आणि अशी संधी मिळावी.


