सोलापूर-डेमो गाडीचे वेळापत्रक प्रवाशांच्या सोयीचे करावे – केम येथून प्रवाशांची मागणी

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) : सोलापूर-दौंड डेमो ही नवीन सुरू झालेली रेल्वे गाडी प्रवाशांच्या जास्त सोयीची नसल्याने या गाडीला प्रवाशांचा कमी प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे तिची वेळ बदलून विद्यार्थ्यांसह इतर प्रवाशांच्या सोयीची करावी अशी मागणी केम येथील नागरिकांतून होत आहे.
रेल्वे विभागाने प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन सोलापूर दौंड व दौंड सोलापूर डेमो गाडी दि.१७मार्च पासून सुरू केली आहे. ही गाडी सोलापूर येथून सकाळी १० वा. सुटते. या गाडीला मोहोळ,माढा,कुडूवाडीं केम जेऊर पारेवाडी, भिगवण, असे थांबे दिले आहेत हि गाडी दौंड येथे साडे तीन वा,पोहचते परत ही गाडी सायंकाळी सहा वाजता सुटते व सोलापूर ला सायंकाळी १०:३५ ला पोहचते. परंतू या गाडीची असलेली वेळ प्रवाशांना सोयीची नसल्याने प्रवाशांचा प्रतिसाद अत्यल्प आहे.
जर ही गाडी दौंड येथून सकाळी पाच वाजता सोडल्यास ती गाडी सोलापूर येथे साडे नऊ च्या आसपास पोहचेल व सायंकाळी परत ही गाडी सायंकाळी सहा वाजता सोडल्यास जेऊर, केम, माढा, मोहोळ येथील प्रवासी, विद्यार्थी, नौकरदार, रूग्ण व्यापारी यांना कुर्डूवाडी, बार्शी, पंढरपूरला जाण्यासाठी सोयीचे होईल. तसेच केम येथील महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कुर्डूवाडी सोलापूरला अप,डाऊन करता येइल.
ही गाडी सकाळी दौंड येथून सोडल्यास प्रवाशांचा प्रतिसाद मिळून रेल्वे ला उत्पन्न वाढेल तरी रेल्वे विभागाने याचा विचार करून या गाडीची वेळ बदलून ती दौड येथून सोडावी असी मागणी केम व परिसरातील प्रवाशातून होत आहे.
सोलापूर दौंड डेमो ही नवीन सुरू झालेली गाडी रेल्वे प्रशासनाने सोलापूर ऐवजी दौंड येथून सकाळी सोलापूर ला सोडावी म्हणजे केम येथील कुर्डूवाडी सोलापूर ला महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अप डाऊन करता येईल व विद्यार्थ्यांची सोय होईल. – प्रशांत सावंत भिसे कॉलेज, कुर्डुवाडी