शिवसेना महिला आघाडी (ठाकरे गटाचा) मराठा आरक्षण आंदोलनास जाहीर पाठिंबा -

शिवसेना महिला आघाडी (ठाकरे गटाचा) मराठा आरक्षण आंदोलनास जाहीर पाठिंबा

0

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळण्यासाठी अंतरवाली सरटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात साखळी उपोषण सुरू आहे. करमाळा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने करमाळा तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू या उपोषणासाठी करमाळा तालुका शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख वर्षा चव्हाण केम शहराध्यक्ष आशा मोरे, युवती सेनेच्या अध्यक्ष गौरी मोरे यांनी उपस्थित राहून या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

मराठा समजाला आरक्षण’ मिळण्यासाठी तालुक्यातील ५० गावात नेत्यांना प्रवेश बंदी – करमाळा तहसीलमध्ये साखळी उपोषण सुरू

केम येथील मराठा तरूण केम ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये व्यस्त आहेत परंतू शिवसेनेच्या महिला आघाडीने पुढे येऊन या आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा दिल्याबद्दल मराठा समाजाने त्यांचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!