श्री उत्तरेश्वर मंदिरातील शिवलिंगास करण्यात आली पानाच्या मखराची सजावट
केम (संजय जाधव) – केम येथील ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर मंदिरामध्ये पाडव्या निमित्त शिवलिंगाची पानाच्या मखराची सजावट करण्यात आली. हि सजावट श्री उत्तरेश्वर भक्त दादासाहेब नवले व युवराज लांडगे, शुभम यांनी केली होती. काल दिवाळी पाडवा असल्याने मंदिरात भाविकांनी दर्शन घेण्यासाठी मंदिरात गर्दी केली होती. या केलेल्या सजावटीचे भाविकांमधून कौतुक करण्यात आले.