कुऱ्हाडे परिवाराचे सामाजिक योगदान महत्त्वाचे – मान्यवरांकडून प्रशंसा

करमाळा, ता. २६ : कुऱ्हाडे परिवाराने दाखवलेली माणुसकी, सामाजिक जाणीव आणि मदतीचा हात हे त्यांचे सामाजिक योगदान मोलाचे आहे, असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले. नारायण कुऱ्हाडे व सौ. सखुबाई कुऱ्हाडे यांच्या ५८ व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळ्यात हे मत व्यक्त करण्यात आले.

२५ मे रोजी रायगड लॉन्स, करमाळा येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला सामाजिक, प्रशासनिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्याचे औचित्य साधून सर्वांनी त्यांच्या जीवनप्रवासातील आदर्शमूल्यांचे गौरवपूर्वक स्मरण केले.

या कार्यक्रमाला डॉ. काकासाहेब डोळे, पोलिस उपायुक्त,डॉ. नामदेव भोसले, सह सचिव, मंत्रालय, डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे डॉ. शहाजी कानगूडे, प्रगतीशील शेतकरी व व्यावसायिक विझेरीचे व्यावसायिक राचकर सर व श्री. शिवाजी राचकर ॲड. डॉ.बाबूराव हिरडे, श्री. प्रमोद झिंजाडे या सर्वांनी आपल्या मनोगतातून कुऱ्हाडे कुटुंबीयांच्या सामाजिक भान आणि सहकार्य वृत्तीचे कौतुक केले.
कार्यक्रमात वाघमोडे, गेठे, बंडगर, शिंदे, शिरगिरे, पांढरे, सातपुते, हाके, रूपनवर, देशमुख, तसेच कुऱ्हाडे कुटुंबातील सदस्य, नातेवाईक व मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी अनेकांनी नारायण आणि सखुबाई कुऱ्हाडे यांच्या प्रदीर्घ सहजीवनाबद्दल प्रेम, कृतज्ञता आणि प्रेरणा व्यक्त केली. त्यांच्या संघर्षमय जीवनप्रवासातील मूल्ये आणि जीवनशैली नव्या पिढीसाठी एक आदर्श असल्याचे मत सर्वांनी मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्यांच्या मुलगी मीनाताई कुऱ्हाडे-सातपुते आणि नात दिपाली सातपुते-मोरे यांनी अत्यंत हृदयस्पर्शी व सुंदर शैलीत केले. कार्यक्रमाची सांगता आनंददायी आणि स्नेहमिलनाच्या वातावरणात झाली.
“नारायण कुऱ्हाडे व सखुबाई कुऱ्हाडे यांच्या ५८ वर्षांच्या सहजीवनाचा आढावा घेतल्यावर, त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतून समाजाला मार्गदर्शक ठरणारे आचरण दाखवले आहे. त्यांनी एकमेकांप्रती, कुटुंब व समाजाप्रती दाखवलेले प्रेम हे अलौकिक आहे. नव्या पिढीला त्यांनी जगण्याचे खरे अर्थ सांगितले आहेत. संसार, संस्कार आणि समाजशीलतेचा आदर्श त्यांनी जगासमोर ठेवला आहे. त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि भावी आयुष्यासाठी शुभेच्छा!”
● डाॅ. ॲड. बाबूराव हिरडे, करमाळा



