भरधाव टेंपो चालकाचा ताबा सुटला – टेंपो शिरला थेट दुकानात – चालक जखमी..

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा शहराजवळील बायपास रस्त्यावरील हॉटेल राजयोग समोर एका टेंपो चालकाने आपल्या ताब्यातील टेंपो भरधाव वेगात चालवून समोरून येणाऱ्या पिकअप जीप ला धडक देवून शेजारील घाडगे यांच्या दुकानात शिरला आहे, यामध्ये पिकअप जीप, टेंपो तसेच घाडगे यांच्या दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, टेंपो चालक मात्र या टेंपोमध्ये अडकला होता. यात अद्याप गुन्हा झालेला नव्हता, सदर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

यामध्ये टेंपो हा अहमदनगर मार्गे टेंभुर्णी कडे जात होता, यात टेंपो चालकाने आपल्या ताब्यातील टेंपो इतक्या वेगाने चालवत होता कि, टेंपो पिकअप ला धडक देवून दुकानात शिरला यात टेंपोचे नुकसान झाले तसेच चालक यात अडकून पडला. यामध्ये टेंपोचे समोरील भागाचे पूर्ण नुकसान झाले होते, यात चालक मात्र अडकला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी स्थनिक नागरिकांनी मदत केली, या अपघातात पीकअप जीप चेही नुकसान झाले आहे. या अपघातात दोन्ही गाड्यांचे चालक जखमी झाले आहेत. तसेच या अपघातात घाडगे यांच्या दुकानात टेंपो शिरल्यानंतर याठिकाणी कोणीही नव्हते त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

या अपघाताची माहिती मिळताच वाहतुक पोलिस प्रदीप जगताप व दिपक कांबळे घटनास्थळी हजर राहुन त्यांनी तातडीने अडकलेला टेंपो चालक बाहेर काढला व त्याला उपचारासाठी रुग्णवाहिकेने करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!