एसटी बस खड्ड्यात पडली – प्रवासी जखमी..
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : करमाळा येथील मोरवड-करमाळा ही बस खड्ड्यात पडल्याने एसटी मधील प्रवासी जखमी झाले असून, त्यांचेवर येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. हे प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकरणी बस चालकाविरूध्द करमाळा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यात बसस्थानकप्रमुख संजय विठ्ठल कदम यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की १३ नोव्हेंबरला सकाळी साडेसात वाजता मोरवडहून करमाळा येथे येत असलेल्या एसटी बस क्र. एमएच १४ बीटी ०७९४ ही बसचालक भारत लक्ष्मण नलवडे यांनी हयगयीने चालवून व रस्त्याची परिस्थिती न बघता रस्त्याच्या कडेला खड्ड्यात घालून झाडास धडकावून बसचे नुकसान केले. तसेच प्रवासी जखमी झाल आहेत. यात रेखा केशव शिंदे, केशव नामदेव शिंदे, चक्रधर एकनाथ कांबळे, श्रीरंग बापू नाळे, प्रणाली पोपट मोहोळकर (सर्व रा. मोरवड ) तसेच वाहक संतोष दशरथ गायकवाड हे किरकोळ जखमी झाले आहेत. यात पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.