अंगणात झोपलेल्या दांम्पत्याच्या वस्तूंची चोरी

0

करमाळा : संदेश प्रतिनिधी

करमाळा : उन्हाळा असल्याने घराच्या बाहेर झोपणाऱ्या लोकांच्या चोऱ्या होण्यास सुरूवात झाली आहे. वंजारवाडी येथील दिपक कृष्णा गीते (वय – ७२) हे शेतात दारे धरण्यासाठी गेले असता, तेथेच झोपले. तेव्हा त्यांच्या उषाजवळील १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरीला गेला तर त्यांची पत्नी अंजना ( वय – ६५) ही घराच्या अंगणात झोपली असताना सोन्याचे मंगळसुत्र व सोन्याचे कानातील फुले असा ३५ हजार रूपयाचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे.

एवढेच नाहीतर सुखदेव तुकाराम केकान, रमेश अरूण गीते व आशिष अंकुश केकान यांच्याही घरातील वस्तू चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास विनायक माहूरकर हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!