संगोबा येथील आदिनाथ महाराज देवस्थानची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न
करमाळा – संगोबा(ता.करमाळा) येथील श्री क्षेत्र आदिनाथ महाराज देवस्थानची यात्रा यावर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या यात्रेसाठी यात्रा कमिटीने चांगल्या प्रकारे जागेची निवड केली होती.त्याठिकाणी स्वछता करण्यात आली होती. पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिली होती. मिठाई, खेळणी,पाळणे, गृहोपयोगी वस्तु, खाद्य पदार्थांचे आदी विविध स्टॉलने यात्रा गजबजून गेली होती.
यात्रेसाठी प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन समिती नेमली होती. गाड्यांची पार्किंगची सोय, दर्शन रांग आदींच्या सूचना माईकवरून दिल्या जात होत्या. शनिवार व रविवार या दोन्हीही दिवशी मंदीरात मोठी गर्दी दिसत होती. या यात्रेसाठी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस एपीआय जगताप, बिट चे शेख,घोरपडे,महसूल चे मंडल अधीकारी ठाकर,मंडल सजाचे तलाठी मयूर क्षीरसागर,ग्रामसेवक दरवडे,तलाठी काळे,सोमनाथ खराडे,रवी जाधव, ऍड शशिकांत नरुटे,सुनिल जाधव,सदस्य अनिल गायकवाड,संदीपन गायकवाड, मारुती जाधव,बबन भालेराव आदींनी परिश्रम घेऊन ही यात्रा यशस्वीपणे पार पाडली. पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी यात्रेसाठी चोख बंदोबस्त दिला होता.
त्यामुळे यात्रेमध्ये कसलाही अनुचित प्रकार घडला नाही. सर्व शासकीय अधिकाऱ्यांचे देवस्थान ट्रस्ट च्या वतीने आभार व्यक्त करण्यात आला.