पक्षकारासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे हे वकिलांचे खरे कर्तव्य — अॅड. अनिकेत निकम

करमाळा, ता.20 : वकिलांनी आपल्या पक्षकाराच्या कामात पूर्ण प्रामाणिकपणे व पारदर्शकतेने काम करणे आवश्यक आहे. निकालाची हमी न देता वकिलांनी मेहनतीची व प्रयत्नांची हमी द्यावी, हेच खऱ्या अर्थाने वकिलीचे धर्मकार्य आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे विधिज्ञ अॅड. अनिकेत उज्वल निकम यांनी केले.

करमाळा येथील अॅड. अमर शिंगाडे व अॅड. भाग्यश्री शिंगाडे यांच्या नवीन वकिली कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, मकाईचे माजी चेअरमन दिविजय बागल, ॲड.ई.एशशी, अॅड.निखिल पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना अॅड. निकम म्हणाले, “न्यायालयीन कामकाज करताना पक्षकारालाही न्यायालयात उपस्थित ठेवावे. निकालाबद्दल गृहीत धरून बोलू नका, परंतु प्रामाणिक प्रयत्नांची हमी नक्की द्या. हेच वकील आणि पक्षकार या दोघांच्या समाधानाचे खरे रहस्य आहे.”

या प्रसंगी करमाळा वकील संघाचे अध्यक्ष राम नीळ, उपाध्यक्ष अलीम पठाण, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, भाजपा महिला प्रदेशाउपाध्यक्ष रश्मी बागल, मुंबई उच्च न्यायालय विधीज्ञ ॲड.रेखा मुसळे, मग काय कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, तालुकाप्रमुख सुधाकर लावंड, सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेठ खाटेर, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड आदी मान्यवर व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. अमर शिंगाडे यांनी केले. अॅड. कमलाकर वीर व विलासराव घुमरे यांनी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन नितीन चोपडे यांनी केले तर आभार प्रदर्शन अॅड. भाग्यश्री शिंगाडे यांनी केले.

