चमत्कारांच्या पडद्याआडचं सत्य - निंभोरेत प्रबोधनात्मक कार्यक्रमात खुलासे -

चमत्कारांच्या पडद्याआडचं सत्य – निंभोरेत प्रबोधनात्मक कार्यक्रमात खुलासे

0
अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे कार्यकर्ते व्ही. आर. गायकवाड व अनिल माने प्रात्यक्षिके सादर करताना

करमाळा(दि.२): शनीशिवपूर (पोथरे) ते पंढरपूर या पायीं दिंडी सोहळ्यात, निंभोरे या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी वारकऱ्यांशी संवाद साधून चमत्कारांमागील विज्ञान उलगडण्याचा प्रयत्न केला.

या कार्यक्रमात अहिल्यानगरचे जिल्हा सचिव व्ही आर गायकवाड,सोलापूर जिल्हा सचिव अनिल माने , करमाळा अंनिसचे मार्गदर्शक प्राचार्य नागेश माने यांनी विविध चमत्कारिक वाटणाऱ्या कृतींचे प्रात्यक्षिकांसह शास्त्रीय विवेचन करून उपस्थितांना अंधश्रद्धेपासून दूर राहण्याचे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. चमत्कार म्हणजे केवळ भ्रम असून, त्यामागे वैज्ञानिक तत्त्वे असतात, हे दाखवण्यासाठी प्रात्यक्षिकांचा उपयोग करण्यात आला.

यावेळी व्ही आर गायकवाड वारकऱ्यांशी संवाद साधताना म्हणाले की, इतरांकडून आदराची अपेक्षा करण्यापेक्षा आपणच इतरांची कदर केली की जगणं खुप आनंदी होऊन जाते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यजमान सरपंच रवींद्र वळेकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ह भ प.अ‍ॅड बाबूराव हिरडे , अंनिसचे तालुका कार्याध्यक्ष दिगंबर साळुंके , संजय हंडे, नवनाथ चौधरी ज्येष्ठ कवी प्रकाश लावंड हरिभाऊ झिंजाडे राजेंद्र परदेशी उपस्थित होते. नानासाहेब पठाडे यांनी सुत्रसंचलन केले.तर डॉ.अ‍ॅड. बाबूराव हिरडे यांनी आभार मानले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!