मतदारांनीच आता निवडणूक हातात घेतलेली आहे : संजयमामा शिंदे
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : वरकटणे (ता.करमाळा) या छोट्याशा गावाने मला 2019 साली अवघी 184 मते दिली होती, त्याच वरकटणे येथील सभेला मिळालेला प्रतिसाद अतिशय उत्साहवर्धक होता, तसेच आज कंदर येथील सभेलाही असाच प्रतिसाद मिळत आहे. मतदारांनीच आता निवडणूक हातात घेतलेली असून, येत्या 23 तारखेला त्याचा रिझल्ट निश्चितच दिसेल असे मत आमदार संजयमामा शिंदे यांनी कंदर (ता. करमाळा) येथील सभेत व्यक्त केले.
मतदारांच्या या उत्साहाबद्दल वाढत्या प्रतिसादाबद्दल बोलताना ते म्हणाले की,2014 पासून ही माझी तिसरी विधानसभा निवडणूक आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद ,लोकसभा निवडणूकही मी पाहिली आहे. परंतु प्रथमच 2024 च्या या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीत मी अंडर करंट पाहतोय.
यावेळी व्यासपीठावर निळकंठ देशमुख, चंद्रकांत सरडे विलास पाटील, अण्णासाहेब पवार, नानासाहेब लोकरे, एड. नितीन राजे भोसले, कन्हैयालाल देवी, एड. शिवराज जगताप ,संजय घोलप,गणेश चिवटे, हनुमंत मांढरे पाटील ,तानाजी झोळ ,प्रवीण जाधव ,विवेक येवले, ॲड.अजित विघ्ने ,सूर्यकांत पाटील, अमोल काळदाते आदी उपस्थित होते. यावेळी जयवंतराव जगताप गटाचे अण्णासाहेब पवार यांनी आमदार संजयमामा शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला, तर नानासाहेब लोकरे यांनी बागल गटामधून शिंदे गटात प्रवेश केला.