केम येथील ऊत्तरेश्वर देवस्थानच्या यात्रेला महाशिवरात्री पासून होणार सुरवात- विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन - Saptahik Sandesh

केम येथील ऊत्तरेश्वर देवस्थानच्या यात्रेला महाशिवरात्री पासून होणार सुरवात- विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) -केम (ता. करमाळा) येथील जागृत ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर बाबाची यात्रा महाशिवरात्री पासून सुरूवात होणार आहे या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत असी माहिती सचिव मनोज सोलापुरे यांनी दिली या मध्ये शिवलीलामृत ग्रंथ पारायण, लघुरुद्राभिषेक, कीर्तन, हरी जागर,श्रीस नैवेद्य, ब्राह्मण भोजन श्रीस अभिषेक असे नित्यनेमाने धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

  • दि ८ रोजी – सकाळी ९ ते ११ ग्रंथ पारायण रात्री ९ ते ११ ह.भ.प. सुरेशं थिटे महाराज यांचे कीर्तन व रात्री ११ नंतर हरि जागर
  • दि ९ रोजी – रात्री ९ ते ११ ह.भ.प. घाडगे महाराज यांचे कीर्तन व रात्री ११नंतर हरि जागर
  • दि १० रोजी – ९ ते ११ ह.भ.प. लालासाहेब चोपडे यांचे कीर्तन व रात्री ११ नंतर हरि जागर
  • दि ११ रोजी – रात्री १२.०५मि. श्री चा भव्य छबीना निघणार आहे

या छबिन्या समोर नयनरम्य असे शोभेचे दारूकाम होणार आहे त्यानंतर गावातून रात्रभर मिरवणूक दि १२रोजी श्री ऊत्तरेश्वर आखाड्यांमध्ये दुपारी १नंतर मल्ल्यांच्या जंगी कुस्त्या होणार या कुस्त्या साठी नामवंत पैलवानाची हजेरी लागणार आहे या हि यात्रा शांततेने पार पाडावी या साठी यात्रा कमीटिची बैठक झाली. या मिटिंगला करमाळा तालुक्याच्या तहसिलदार शिल्पा ठोकडे, करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे, तसेच करमाळा आगाराचे श्री.कदम सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री.जाधव, आरोग्य विभाग,वीज मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

या वेळी श्री उत्तरेश्वर देवस्थान कमेटिचे सचिव मनोज सोलापूरे यांनी यात्रेसाठी केम-टेंभूर्णी एसटी सोडाव्यात तसेच करमाळा नगरपालिकेकडून अग्नीशामक गाडी यात्रेसाठी द्यावी अशी मागणी केली. तसेच युवा नेते सागर दौंड यांनी यात्रा कालावधीत दारू बंदी करावी, तसेच फिरते शौचालय मिळावे मागणी केली. या वेळी तहसिलदार शिल्पा ठोकडे यांनी केम यात्रेसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच मतदार नोंदणीसाठी यात्रेमध्ये स्टॉल लावले जाणार आहे, असे त्यानी सांगितले. तसेच करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी यात्रेत कुठलाही अनुचीत प्रकार घडू नये तसेच यात्रा कालावधीत दहावी,बारावी,परिक्षा असल्याने पोलीस बंदोबस्त चोख राहणार आहे असे त्यानी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!