केम येथील ऊत्तरेश्वर देवस्थान ची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली

केम (प्रतिनिधी/संजय जाधव): केम (ता. करमाळा) येथील श्री उत्तरेश्वर देवस्थानची यात्रा यावर्षी मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडली. या यात्रेसाठी यात्रा कमिटीने विशेष परिश्रम घेतले. या यात्रेमध्ये मिठाई,खेळणी,पाळणे,गृहपयोगी वस्तू खाद्य पदार्थांचे विविध स्टॉल ने यात्रा गजबजून गेली होती.

या यात्रेसाठी प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन समिती नेमली होती. श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. श्रीचा भव्य असा छबीना निघाला होता. या छबिन्या समोर नयनरम्य असे शोभेचे दारूकाम झाले. ही हे हे शोभेचे फटाके तब्बल पाऊण तास ऊडत होते. हे पाहून भाविकांच्या डोळ्याचे पारणे फिटले. यात्रेत कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये म्हणून करमाळा पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक प्रविण साने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.
या छबिन्या ची मिरवणूक तब्बल आठ तास चालली मिरवणूक मार्गावर ऊत्तरेश्वर भक्तानी रांगोळी काढली होती. केम ग्रामपंचायतीचे वतीने मंदिर मार्ग ते शिवसंभो प्रवेशद्वार पर्यंत पाणी मारले होते. त्यामुळे धूळ ऊडाली नाही. या यात्रेसाठी करमाळा, कुर्डूवाडी आगाराने टेंभुर्णी केम कुर्डूवाडी केम अशा गाडया सोडाव्यात अशी मागणी केली होती, परंतु ज्यादा गाडया सोडल्या नव्हत्या. त्यामुळे टेंभुर्णी हून येणाऱ्या भाविकांचे हाल झाले त्यामुळे करमाळा, कुर्डूवाडी आगारा विषयी यात्रेकरूनी नाराजी व्यक्त केली.