उघड्या घरात शिरून ४८ हजार रूपयाची चोरी – विहाळ येथील घटना..

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा, ता. ४ : घराचा दरवाजा उघडा पाहून चोरांनी घरात शिरून कपाटातील सोन्याचे मंगळसुत्र व मोबाईल असा ४८ हजार रूपयाचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. हा प्रकार विहाळ येथे १ मे च्या मध्यरात्री घडला आहे. या प्रकरणी आजीनाथ मच्छिंद्र नाळे (रा. विहाळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले, की १ मे च्या रात्री आम्ही जेवण करून झोपलो असता, मध्यरात्री घरात आवाज आल्याने मी जागा झालो, त्यावेळी घरातून एक माणूस पळून जाताना पाहिला, त्याचा पाठलाग केला असता, तिघेजण होते. त्यांनी माझा मोबाईल व आईचे सोन्याचे मंगळसुत्र असा ४८ हजार रूपयाचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक प्रविण साने हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!