सालसे येथून मोटारसायकलची चोरी..

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : सालसे (ता. करमाळा) येथून १ एप्रिलच्या मध्यरात्री : घरासमोर लावलेली ४५ हजार रूपये किंमतीची बजाज कंपनीची मोटारसायकल चोरीला गेली आहे. या प्रकरणी विठ्ठल दत्तात्रय घाडगे (रा. सालसे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की मी पुणे येथे असतो.

आमच्या गावातील यात्रा असल्याने गावाकडे आलो होतो. बजाज कंपनीची ४५ हजार रूपये किंमतीची मोटारसायकल १ एप्रिलला रात्री घरासमोर हॅन्डल लॉक करून लावली होती. परंतु सकाळी पाहिले असता सदरची मोटारसायकल दिसून आली नाही. शोधाशोध करून तपास लागला नाही, त्यामुळे सदरची मोटारसायकल चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!