करमाळा शहरातून भरदिवसा मोटरसायकलची चोरी.. -

करमाळा शहरातून भरदिवसा मोटरसायकलची चोरी..

0


करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.8: करमाळा शहरातून मोटरसायकलची भरदिवसा चोरी झाली आहे. हा प्रकार बारामती बँकेजवळ 5 ऑक्टोबर ला घडला आहे. या प्रकरणी शेलगाव (क) येथील ज्ञानेश्वर नामदेव जाधव यांनी फिर्याद दिली आहे.

त्यात त्यांनी म्हटले की, 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.00 वा.गंवड्याच्या हाताखाली लेबर म्हणून कामाला आलो. त्यावेळेस मी माझी 19,000/- रू. किंमतीची बजाज डीस्कव्हर कंपनीची काळ्या रंगाची लाल पट्टा असलेली मोटरसायकल क्रमांक एम.एच.45 जे. 1820 ही करमाळा येथील मंगळवार पेठेतील बारामती बँकेजवळ उभी केली होती. ती कोणीतरी अज्ञात चोरटयाने मुददाम लबाडीने चोरून नेली आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!