दवाखान्यासमोर लावलेल्या मोटारसायकलची चोरी.. - Saptahik Sandesh

दवाखान्यासमोर लावलेल्या मोटारसायकलची चोरी..

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : टाकळी येथे दवाखान्यासमोर लावलेल्या मोटारसायकलची चोरी झाली आहे. हा प्रकार २४ जुलैला सायंकाळी ६ ते ७ च्या दरम्यान घडला आहे. या प्रकरणी मनोहर चतुर नगरे (रा. टाकळी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की २४ जुलैला माझी तब्येत ठिक नसल्याने सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आमच्या बजाज डिस्कव्हर मोटारसायकलवर टाकळी गेटवरील डॉ. मिलींद टिकेदा यांच्या आयुर्वेदिक दवाखान्यात उपचारासाठी गेलो होतो.

त्यावेळी मोटारसायकल रस्त्याच्या कडेला उभी होती. पाऊस असल्याने सायंकाळी सात पर्यंत दवाखान्यात थांबावे लागले. त्यानंतर बाहेर आलो असता, माझी २० हजार रू. किंमतीची काळ्या रंगाची बजाज कंपनीची डिस्कव्हर मोटारसायकल चोरट्याने चोरून नेली असल्याचे लक्षात आले. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक माहुरकर हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!